कर्म सिद्धांत!

“जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” तसेच
“कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!”
कर्म ह्या विषयावरची अनेक गाणी, ओळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात रोजच ऐकत असतो. पण कर्म म्हणजे नक्की आहे तरी काय? आपलं कर्म आपले नशीब बनवते, अर्थात आपल्या नियतीलासुद्धा. चांगल्या कर्माचे फळ चांगले, तर वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. “What goes around , comes around”.
माणसाची प्रगती वा अधोगती तसेच त्याला मिळणारे सुख आणि दुःख: हे प्रत्येकाच्या कर्माचेच फळ असते. रामायणातील राम-रावण असोत, महाभारतातील कौरव-पांडव असोत, अगदी आताच्या काळातील मोठे-मोठे राजकारणी, व्यापारी इत्यादी तसेच सामान्य लोक असोत, कर्माचे काळ कुणालाच चुकले नाही.
चांगल्या कर्माने व्यक्तीचा तसेच सर्वार्थाने जगाचा विकास होतो, तर वाईट कर्माने ह्याच्या अगदी उलट होते. म्हंणूनच चांगले कर्म करीत राहणे गरजेचे आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!”, म्हणजेच कर्म करीत राहा, फळाची आशा करू नकोस. आपण आपली चांगली कृत्ये करीत राहावीत. आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ हे मिळतेच!
“जे पेराल तेच उगवते”, म्हणूनच चांगले विचार पसरवावेत. देवापेक्षा कर्माची भीती बाळगणे गरजेचे आहे कारण एकवेळ देव माफ करेल पण कर्म नाही. आपल्याशी वाईट वागणाऱ्या लोकांशी वाईट न वागता “धर्माने” वागावे कारण वाईट माणसाचे वाईट कर्म त्याला कधीही सोडत नाही. म्हणूनच भगवान कृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण आपले कर्म करीत राहावे. आपल्याशी वाईट वागणाऱ्याशी वाईट वागू नये. इंग्रजीत म्हटल्याप्रमाणे, “No need for revenge, just sit back and wait. Those who hurt you will eventually screw up themselves and if you are lucky. God will let you watch.”
सगळ्यांशी प्रेमाने वागणे, कृतज्ञता बाळगणे, आपल्या उद्दिष्टाप्रती प्रामाणिक राहून प्रगती करीत राहणे, आली कृती चांगली ठेवणे, दुसर्यांना माफ करणे हे सद्गुण जोपासावेत. जे आपल्याला स्वतःसोबत होऊ नये असे वाटते, ते आपण इतरांसोबत करू नये.
कुठेतरी वाचलंय कि, “karma has no menu. You get served what you deserved.”
“अपने कर्म हि अपनी पहचान हैं,
वरना एक नाम के तो हजारो इन्सान हैं!”
©अनिता घेवडे
